७ ऑक्टोबर १२ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाचा आरंभ झाला. त्यावेळी कारागृह अधीक्षर शिंदे साहेब, दीपक चांदोरकर, चंद्रकांत जैन, दिलीप पाटील |
आपल्या जीवनात प्रथमच सार्वजनिक सभेत बोलण्याचे धाडस एका वयोवृद्ध बंदी बांधवाने केले. |
माझ्या उपक्रमाबद्दल
भरभरून स्तुती करून आभार व्यक्त करणारा हा तरूण बंदी
जळगावच्या बंदीजनांनी गिरविले सुंदर हस्ताक्षराचे धडे
किशोर कुळकर्णींच्या राज्यस्तरीय उपक्रमाच शुभारंभ
जळगाव दि. ७
(प्रतिनिधी) आपण सुंदर
दिसण्यासाठी अट्टाहास करतो त्याप्रमाणे
आपल्या हातून सुंदर कामे
व्हावी, सुंदर लेखन व्हावे
यासाठी प्रत्येकाने संकल्प घ्यावा.
घडवा सुंदर हस्ताक्षर
ह्या उपक्रमामुळे सर्व
बंदीजनांना अक्षर सुधारण्याची सुवर्णसंधी
उपलब्ध झाली आहे,
या संधीचे सोने
करावे. असे आवाहान
जळगाव जिल्हा कारागृह
अधीक्षक ई.जी.
शिंदे यांनी आज
केले. मा. अप्पर
पोलीस महासंचालक पुणे
व कारागृह उपमहानिरीक्षक
औरंगाबाद यांच्या मान्यतेनुसार जळगाव
येथील सुंदर हस्ताक्षर
मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांच्या
घडवा सुंदर हस्ताक्षर
उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते
बोलत होते. या
कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील सेवाभावी
संस्था स्व. वसंतराव
चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर
विशेष अतिथी म्हणून
उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कारागृहे व किशोर
सुधारालयात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा
घेण्याचा संकल्प जैन इरिगेशन
प्रसिद्धी विभागात कार्यरत किशोर
कुळकर्णी यांनी घेतला. त्यानुसार
जळगाव जिल्हा कारागृहाचे
अधीक्षक ई.जी.
शिंदे यांच्या पुढाकाराने
ह्या सेवाभावी उपक्रमाचा
शुभारंभ आज ७
ऑगस्ट २०१२ रोजी
सकाळी १०.३०
ते ११.३०
दरम्यान झाला. या उपक्रमात
एकूण ४२६ बंदीजनांनी
भाग घेतला. श्री
कुळकर्णी यांनी बंदीजनांना सुंदर
हस्ताक्षराचे महत्त्व तसेच सुंदर
हस्ताक्षर कसे काढावे
याबाबत सोदाहरण स्पष्टीकरण केले.
अक्षरासमवेत त्यांनी उद्बोधक, संस्कारक्षम
छोट्या गोष्टी देखील सांगितल्या.
रंजक पद्धतीने सुंदर
हस्ताक्षर कसे काढावे
याचे धडे बंदीजनांनी
गिरवून घेतले. यावेळी काही
निरक्षर बंदींनी आपणास अक्षरज्ञान
व्हावे किंवा साक्षर व्हावे
याबाबतची इच्छा व्यक्त केली,
त्यांना देखील कुळकर्णी मार्गदर्शन
करणार आहेत. कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी दीपक चांदोरकर
यांनी संगीताच्या माध्यमातून
बंदीजनांचा ताणतणाव कसा दूर
होतो याचे महत्त्व
विषद केले. या
कार्यक्रमाचे प्रास्तावीक गांधी रिसर्च
फाउंडेशनचे सहकारी संतोष भिंताडे
यांनी केले.
फोटोकॅप्शन
- जळगाव जिल्हा कारागृहात बंदीजनांना
सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शन
करताना किशोर कुळकर्णी व्यासपीठावर
स्व. वसंतराव चांदोरकर
प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर,
कारागृह अधीक्षक ई.जी.
शिंदे व मान्यवर.
(छायाचित्र-ईश्वर
राणा)
http://www.prahaarmaza.com/District.aspx?NewsId=121#.UHLZZpjMj54
http://www.prahaarmaza.com/District.aspx?NewsId=121#.UHLZZpjMj54
No comments:
Post a Comment