http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15524311.cms
सुंदर हस्ताक्षर योजनेवर टीका
विश्वास पुरोहित
कल्याण डोंबिवलीतल्या पालिका शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षरांसाठी २५ लाख रुपयांची उधळपट्टी सुरू असली तरीया हस्ताक्षर योजनेने ठाणे पालिका आणि रायगड जिल्हा परिषदेला यापूर्वीच गुंडाळले असून नवी मुंबई ,मुंबईतल्या पालिका शाळांमध्ये ही योजना येऊ घातली आहे . सुंदर हस्ताक्षराच्या प्रशिक्षणासाठी एकाच संस्थेलालाखो रुपयांची खैरात वाटली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .
ठाण्यात गेल्या वर्षी सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना हस्ताक्षर प्रशिक्षण दिले गेले असून , त्यासाठी तब्बल दीड कोटीरुपयांची तरतूद शिक्षण मंडळाने केली होती . यंदाही या हस्ताक्षर योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचेसमजते . रायगड जिल्हा परिषदेतील दोन तालुक्यांमधील १००० विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधार प्रकल्पाचे धडेदेण्यात येत आहेत . यात ४०० रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे चार लाखांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे .मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही ही योजना शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असून तिथलीकामे मिळाली तर या संस्थेच्या पदरात कोट्यावधी रुपये पडतील .
ही योजना राबविणारे अक्षरशिल्प संस्थेचे नरेंद्र महाडीक यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना सुंदरहस्ताक्षर प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्या पर्सनालिटीचा कसा विकास करता येईल याचे मार्गदर्शनही या योजनेतदिले जाते . गेली ८ वर्ष आम्ही हा उपक्रम मोफत राबवत असून प्रवास , शिक्षकाचा खर्च शक्य नसल्याने सध्या पैसेआकारले जात आहेत . गेल्या वर्षी ४०० रुपये आकारले जात होते . तर यंदा ४५० रुपये आकारले जात आहेत असेत्यांनी सांगितले .
केडीएमसी शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणाला अद्याप मुहूर्त सापडत नसताना हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प एवढ्यातातडीने कसा राबवला गेला असा सवाल केडीएमसीच्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे .
................................................................................
वीज नसलेल्या शाळेत हस्ताक्षराचे धडे
सुंदर हस्ताक्षर प्रकल्पाची डोंबिवलीतील मोठागावमधील महापालिका शाळेत दिमाखाने उद्घाटन सोहळा पारपडला असला तरी या शाळेत वीजेचे कनेक्शनच दिले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे . शाळेतदिवे नाही , पंखे नाही . कंम्प्युटर्सही धूळ खात पडून आहेत . प्यायला पाणीही नाही . शाळेसाठी मुख्याध्यापकनेमलेला नाही . ही सारी अनागोंदी दूर करण्याऐवजी शिक्षण मंडळ सुंदर हस्ताक्षराचे वर्ग सुरू करण्याच धन्यतामानत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे .
..................................................................................
सुंदर हस्ताक्षर प्रकल्प हा कौतुकास्पद उपक्रम असला तरी महापालिका शाळांची सद्यस्थिती विदारक आहे .शाळांमध्ये मुलभूत सुविधा नाहीत . हस्तांक्षरांऐवजी विद्यार्थ्यांची भाषा आणि व्याकरण आधी सुधारणे गरजेचेअसून शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी केल्यास तेदेखील हस्ताक्षराचे धडे देऊ शकतील . मग खासगी संस्थांचीनेमणूक का केली जाते . संस्थांची नेमणूक करायची असल्यास टेंडर का काढले जात नाही .
- विवेक पंडित , शिक्षणतज्ज्ञ (17.09.2012 Maharashtratimes)
................................................................................................................................
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15592979.cms | ||
|
कल्याण-डोंबिवली महापालिकेपाठोपाठ सुंदर हस्ताक्षर प्रकल्पासाठी मुंबई महापालिकाही लाखो रुपये खर्च करणार आहे. महापौर दालनात मंगळवारी या प्रकल्पासाठी बैठक घेऊन शिक्कामोर्तब करण्यात आले.
कल्याण-डोंबिवली पालिका सुंदर हस्ताक्षर प्रकल्पासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करणार आहे. मुंबईत शहर ,पूर्व , पश्चिम उपनगरात प्रत्येकी दोन शाळांमध्ये सध्या प्रायोगिक पातळीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या निकालानंतरच सार्वत्रिक प्रयोग करण्याचा निर्णय पालिका घेणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. दरम्यान , या प्रकल्पाबाबत येणाऱ्या खर्चाबाबत महापौरांकडे विचारणा केली असता बजेटमध्ये योग्य तरतूद करण्यात आल्याचे सांगत खर्चाविषयी बोलणे त्यांनी टाळले.
(21.082012 Maharashtra Times)
.................................................................................................................................
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13041692.cms
हस्ताक्षराचे गिरवले धडे
' हस्ताक्षर हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे , त्यामुळे ते नीटनेटके काढण्यावर भर द्या ', असा सल्ला विनायक अपसिंगकर यांनी ' महाराष्ट्र टाइम्स ' मार्फत आयोजित हस्ताक्षर कार्यशाळेमध्ये दिला. ' मटा ' मार्फत आयोजित या कार्यशाळेत लहानांपासून मोठ्यांनी हस्ताक्षराचे धडे गिरवले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये असलेले हस्ताक्षराचे महत्त्व लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अनेकदा हस्ताक्षर चांगले नसल्यामुळे मांडणी करण्यात कमी पडणारे विद्यार्थी बुद्धीमत्ता असूनही मागे पडतात. सुवाच्च अक्षराअभावी त्यांच्यामध्ये असलेले ज्ञान ते योग्य प्रकारे सादर करू शकत नाहीत. त्यांना केवळ वरवरचे मार्गदर्शन न करता अक्षर शिकवण्यापासून मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विनायक अपसिंगकर यांनी यावेळी मराठी मूळाक्षरे , इंग्रजी अक्षरे तसेच कर्सिव्ह अक्षरे कशा प्रकारे वळणदार काढावीत हे प्रात्यक्षिकासह दाखवले. प्रत्येक अक्षराला लांबी आणि रुंदी असते ती लक्षात घेऊनच लिहिणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लिहिताना मोठ्या पेन्सिलचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच अक्षरांमधील अंतरही समान काढावे , असे त्यांनी सांगितले. हे नियम लक्षात ठेवल्यास हस्ताक्षर नक्कीच सुवाच्च आणि सुंदर बनते, असे ते म्हणाले. चांगले अक्षर काढण्याच्या नादात अनेकदा लिहिण्याची गती मंदावते त्यामुळे सातत्याने सराव आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राने हॉल उपलब्ध करून देण्याचे सहकार्य केले.
(May 8, 2012, )
No comments:
Post a Comment