धुळे येथील बंदीजनांनी गिरविले सुंदर हस्ताक्षराचे
धडे
सुंदर
हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णींचा राज्यस्तरीय उपक्रम
धुळे दि. १० (प्रतिनिधी) – सुंदर हस्ताक्षर हा
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा दागिना असतो. आपले अक्षर चांगले तर स्वभाव आणि मनही
चांगले अशी छाप सुंदर हस्ताक्षर पाहिल्यावर पडते त्यासाठी आजच हस्ताक्षर
सुधारण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन जळगाव येथील सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक आणि
सुंदर हस्ताक्षर उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबविणारे किशोर कुळकर्णी
यांनी धुळे बंदीजनांना केले. दि. ९ रोजी धुळे जिल्हा कारागृहात त्यांचा घडवा सुंदर
हस्ताक्षर घडवा सुंदर मन हा उपक्रम आयोजण्यात आला होता. आपल्या मार्गदर्शनात ते
बोलत होते. यावेळी मंगेश जगताप (तुरुंग अधिकारी श्रेणी १), एस. एच. आढे (तुरुंग
अधिकारी श्रेणी २), यु.पी. पाटील (तुरुंग अधिकारी श्रेणी २), वैद्यकीय अधिकारी
व्ही.डी. गडे, शिक्षक पी.बी. रनाळकर, एच.एल. पोतदार, जी.बी. वाडीले आणि कासोदा
येथील डॉक्टर पांडूरंग पिंगळे हे देखील होते.
महाराष्ट्रातील कारागृहे व किशोर सुधारालयात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेण्याचासंकल्प इरिगेशनच्या
प्रसिद्धी विभागातील पत्रकार किशोर कुळकर्णी यांनी घेतला.
धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस.सी.भगुरे यांच्या मार्गदर्शन, पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण २००शिक्षीत बंदीजनांनी सहभाग
घेतला. सुंदरहस्ताक्षरांचे मूळ नियम, मूळचिन्हे, करावयाचा सराव, पेन धरण्याची पद्धत
आणि सुंदर हस्ताक्षरासाठी कसा सराव करावा याबाबतचे त्यांनी मार्गदर्शन केले.
अक्षरासमवेत त्यांनी उद्बोधक, संस्कारक्षम छोट्यागोष्टी देखील सांगितल्या. रंजक पद्धतीने सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याचे धडे बंदीजनांनी गिरवून घेतले. कारागृहातील
बंदीजनांनी आपण आपले अक्षर सुधारुन सुधारलेल्या अक्षरात पत्र लिहून पाठवू असे
अभिवचन दिले. यावेळी कासोदा येथील डॉ. पांडुरंग पिंगळे यांनी कैद्यांना वैयक्तिक
स्वच्छता आणि त्याचे महत्त्व याबाबत मौलीक मार्गदर्शन केले. त्वचेच्या रोगासाठी
अंगाची स्वच्छता आणि मानसिक रोगासाठी मनाची स्वच्छता आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन पी.बी. रनाळकर यांनी तर आभार
तुरुंग अधिकारी मंगेश जगताप मानले. या उपक्रमास जैन इरिगेशन आणि जळगाव येथील
चांदोरकर प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment