Wednesday, June 16, 2010

वसा अक्षर दुरुस्ती उपक्रमाचा

वसा अक्षर दुरुस्ती उपक्रमाचा


आजच्या संगणक युगात हस्ताक्षराचे एवढे महत्त्व राहिले आहे काय हो.? तुम्हाला उत्तर होकारार्थी वाटत असेल तर या ब्लॉगकडे लक्ष द्या आणि नाही हे उत्तर येत असेल तर सोडून द्या. मुळीच वाचू नका... अहो तुमच्या मुलांचे अक्षर गचाळ आहे व त्याच्या शिक्षकांची तुमच्याकडे तक्रार आली तर मात्र तुमची धावपळ होऊ शकते. मग सुंदर हस्ताक्षर कसे होईल मुलाचे, त्याला कोणत्या टिप्स दिल्या, प्रॅक्टीस दिल्या तर त्यात सुधारणा होईल. असे सतराशे साठ प्रश्न तुमच्यासमोर येतील. म्हणून म्हणतो या ब्लॉगमध्ये दिलेल्या माझ्या टिप्स हाताळा आणि मुलांचे अक्षर सुंदर बनवा... मग चला तर... तयारी करू या...
साधारणपणे पाचवी ते सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे अक्षर या प्रकल्पात हमखास सुधारते. या माझ्या कार्याबद्दल पुण्यनगरी दैनिकाचे उपसंपादक आनंदा पाटील यांनी वसा अक्षर दुरुस्ती उपक्रमाचा यांच्या सारखे हेच या सदरता सविस्तर मुलाखत घेतली आहे.

जळगाव येथील किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी यांनी अक्षर दुरूस्ती व सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वसा गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे जोपासला आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयांना भेटी द्यायच्या व व तेथील विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्याचे मार्गदर्शन करावयाचे हा त्यांचा प्ररणादायी उपक्रम आहे. नोकरी सांभाळून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे दर शनिवारी ते हा उपक्रम अविरत राबवित आहेत. विशेषतः ते या संदर्भात मानधनाची अपेक्षा न ठेवता केवळ प्रवासाला लागणारा खर्च घेतात. आपमतलबी या युगात निःव्सार्थी भावनेने काम करणारी अशी माणसं जेव्हा कुठे तरी गवसतात तेव्हा मनाला निश्चित समाधान लाभल्याशिवाय राहात नाही.


सुंदर हस्ताक्षर व अक्षर दुरुस्ती हा उपक्रम आकारास आला कसा? या संदर्भात अतिशय बोलकी माहिती किशोर कुळकर्णी यांनी दिली आहे. ते म्हणताता की, पत्रकार व्हायचं असे मनापासून वाटत होतं,पण गचाळ अङरामुळे बर्यातचदा नाईलाज होत असे. सना १९९३ मध्ये आई वडिलांचा विरोध झुगारुन घरातील अडीच हजार रुपये चोरुन करणखेडा (ता. अमळनेर) येथून नाशिकला पळून गेलो. तेथे एक वर्षांचा पत्रकारितेला खरी सुरुवात केली. याच कालखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सुंदर हस्ताक्षराचे प्रचार करणारे नाना लाभे यांच्याशी परिचय झाला. त्यांचे हस्ताक्षर वयाच्या सत्तरीतही मोत्यासारखे सुंदर होते. त्यांनी मी लिहिलेल्या बातमीचे कागद डोळ्यासमोर घेतले अन हळूच खर्चातील आवाजात म्हणाले, अक्षरात सुधारणा झाली पाहिजे बरं का? थोडसं खजील झाल्यासारखं वाटलं. मला सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करा, अशी अटकळ नानांकडे धरली. त्यांनी मेहनतीने सराव करून घेतला अन अवघ्या काही महिन्यांत माझ्या हस्ताक्षरात सुधारणा करून दाखविली. त्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरात नाना लाभे यांना पत्र लिहिले. त्यांनी तेथून पत्र पाठवून त्यात नमूद केले की, दुझ्या हस्ताक्षरात सुधारणा झाली पण इतरांचं काय? त्यांचेही अक्षर दुरुस्त कर . कुळकर्णी यांनी जळगाव जिल्ह्यातील २५० हून अधिक शाळांमध्ये मार्गदर्शन केले. या शिवाय धुळे नंदूरबार आणि जळगावच्या अवतीभवतीच्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. तत्यांची सांगण्याची पद्धत अत्यंत सुटसुटीत, चांगली आहे. ते म्हणतात मराठी वर्णमाल फक्त ९ चिन्हांनी तयार झाली आहे. त्यात वर्तुळ, रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा आणि अर्धवर्तुळ इतके चिन्हे फार झाली

No comments:

Post a Comment